Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

शिवसेना ठाणकर पाडा विभागीय शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुण गौरव

 

शिवसेना ठाणकर पाडा विभागीय शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुण गौरव

उपशहर प्रमुख मोहन उगले यांचा उपक्रम

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

कल्याण :  शिवसेना विभागीय शाखा ठाणकर पाडा यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही शिवसेना उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांच्या पुढाकाराने कल्याण मधील प्रभाग क्रमांक 21, 22, 29, 28 मधील दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सहभागातील विविध सोसायटी यांना कचऱ्याचे डबे वाटप करण्यात आले. मोहन उगले यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण यानुसार शिवसेना ठाणकर पाडा विभागीय शाखा काम करत आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्या, अडी अडचणी सोडविण्यासाठी उपशहर प्रमुख मोहन उगले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते दक्ष असतात. त्यामुळे प्रभागातील नागरिक हक्काने शिवसेना ठाणकर पाडा विभागीय शाखेकडे आपले गाऱ्हाणे मांडतात. लागलीच त्याबाबत संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करून नागरिकांचे समाधान करण्यात येते.

याच अनुषंगाने रविवारी प्रभागातील दहावी, बारावी उत्तीर्ण विद्य्यार्थ्यांच्या गुण गौरव समारंभाचे आणि शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी कचरा वर्गीकरण करण्यासाठी प्रभागातील गृह संकुलांना कचऱ्याचे  डब्बे वाटप करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. त्याप्रसंगी विभागप्रमुख अनंता पगार, स्वप्नील मोरे विजय सुतार, गुलाबराव ढोले, शाखाप्रमुख नितीन कदम, उपशाखाप्रमुख उमेश भुजबळ, महिला शहर संघटक नेत्रा उगले, मीना सावंत, मनीषा बिन्नर, सुरेखा दिघे, गणेश आगिवले, सचिन भाटे, संदीप पगारे, जय पालेकर, पिंटू दुबे, प्रदीप मोरे आदी मंडळी उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.