केडीएमसी अधिकाऱ्यांनी केली पिसवली प्रभागाची पाहणी
शिवसेनेच्या अमित कोळेकर यांनी मांडल्या नागरी समस्या
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : पिसवली प्रभागातील शिवसेने
चे पदाधिकारी तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कल्याण ग्रामीण शहरप्रमुख अमित कोळेकर यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विकासमय पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पाहणी दौऱ्यात केडीएमसी सहायक आयुक्त भारत पवार व इतर अधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरलेले दिसले. या दौऱ्या मुळे प्रभागातील नागरिकांना एकप्रकारचा दिलासा मिळाला असून, तसेच आतापर्यंत कोणीही हा उपक्रम पिसवली प्रभागात राबवला नसून, अमित कोळेकर यांच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नेतृत्व उदयास आले आहे असा सुर नागरिकांकडून येताना दिसला.



