कल्याणमधील 'ताल आर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा - वेळेचे उल्लंघन व अश्लील कृत्य प्रकरणी ३३ जणाविरुद्ध गुन्हे दाखल
कलम भूमी , कल्याण : प्रतिनिधी ,
कल्याण शहरातील छाया टाकी जवळील ' ताल आर्केस्ट्रा बार या बारवर वेळेचे उल्लंघन व अश्लील कृत्य केल्याच्या आरोपाखाली ६ महिला नर्तकासह एकूण २३ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.ही कारवाई महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे ४.४५ वाजता करण्यात आली.कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या शोध पथकाने ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
ताल बारमध्ये निर्धारित वेळेनंतर महिला नर्तक अर्धनग्न अवस्थेत ग्राहकासोबत अश्लील कृत्य करत असल्याचे निदर्शनास आले. ' ई - साक्षी अँप ' च्या माध्यमातून पंचनामा तयार करून संबंधित २३ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला. यात काही ग्राहकांचाही समावेश असून ,त्याच्या नांवाची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही.विशेष म्हणजे , यापूर्वी १८ एप्रिल रोजी या बारवर छापा टाकण्यात आला होता. त्या कारवाईत २२ महिला नर्तकासह ४४ जणांना अटक करण्यात आली होती. दीड महिन्याच्या कालावधीत ' ताल आर्केस्ट्रा बार ' वर करण्यात आलेला हा दुसरा मोठा छापा आहे. या बारचे मालक आणि व्यवस्थापक अरुण शेट्टी यांच्याकडून नियमाचे वार वार उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला असून ,संबंधित ताल बारवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही दिले आहेत.

