क्लस्टर योजना युद्धपातळीवर राबवण्याची
आमदार राजेश मोरे यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून ठाणे महापालिका हद्दीत क्लस्टर योजनेची कामे सुरू झाली आहेत. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतही क्लस्टर योजनेची कामे तातडीने सुरू करावीत त्याचबरोबर आरक्षित असलेल्या भूखडांचा देखील क्लस्टर योजनेत समावेश करावा या मागणीसाठी आज कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, निलेश शिंदे, उपशहर प्रमुख मोहन उगले, माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी, गणेश जाधव, प्रशांत काळे, सुनील वायले, विद्याधर भोईर, माजी नगरसेविका विजया पोटे, छाया वाघमारे, विवेक खामकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आमदार मोरे यांनी क्लस्टर योजनेच्या माध्यमातून धोकादायक इमारती चाळी तसेच झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काचा सुरक्षित निवारा देणे शक्य होऊ शकेल. यामुळे या योजनेचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान आयुक्त गोयल यांनी आमदारांच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात आला असून क्लस्टर योजनाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. तर यावेळी पालिकेच्या दहा प्रभागात प्रत्येकी एक क्लस्टरचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची सूचना देखील उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली.
