राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश माजी सचिव नोवेल साळवे यांच्यावर जीवघेणा हल्ला
कल्याण : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे माजी महाराष्ट्र प्रदेश सचिव नोवेल साळवे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
दिनांक १० जून रोजी संध्याकाळी उल्हासनगर कॅम्प ३,१७ सेक्शन येथुन नोवेल साळवे जात असताना त्यांनी पाहिले की काही लोक मिळून वृद्ध सिंधी व्यक्तीला मारहाण करीत आहेत. साळवे यांनी मध्यस्थी करून तो भांडण सोडविण्याचे प्रयत्न केला असताना त्यातील एका गुंडप्रवृतीच्या व्यक्तीने मागुन येवून बांबूने साळवे यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. ज्यात त्यांचा ब्लडप्रेशर शूटआउट झाला व त्यांना कार्डीएक अटॅक आला व ते जागीच कोसळले. घडलेल्या या सर्व घटनेची माहिती देण्यासाठी नोवेल साळवे यांचा मुलगा व पत्नी हे उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस स्टेशन च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्व घडलेली माहिती दिली त्यानंतर नोवेल साळवे यांची जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाली. सर्वात पहिले उल्हासनगर येथील मीरा दवाखान्यात घेऊन जाण्यत आला तिथे उपचार देण्यासाठी मनाई करण्यात आली, तिथून मग साईबाबा प्लॅटिनम दवाखान्यात घेऊन जाण्यत आला तिथे त्यांना मनाई करण्यात आले त्यानंतर साळवे यांना कल्याण येथील हॉली क्रॉस हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले तिथे ही उपचार देण्यासाठी मनाई करण्यात आले शेवटी नोवेल साळवे यांचे जीव वाचवायचे काम खडकपाडा येथील आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केले. एका सामाजिक कार्यकर्त्यांवर अशी वेळ येणे ही आरोग्य क्षेत्रासाठी मोठी शोकांतिका आहे.
नोवेल साळवे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे उल्हासनगर हिराघाट येथील विनो
द सिट कवरचे मालक व त्यांच्या गुंडांवर सेंट्रल पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कुटल्या प्रकारचे ठोस कारवाई करू न शकल्यामुळे सर्व राजकीय पक्ष व व्यापारी लोकांमध्ये त्याबद्दल रोष आहे. या विषयावर मोठे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

