शिवसह्याद्री प्रतिष्ठान वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव व वह्या वाटप समारंभ संपन्न ,
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : शिव सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य कल्याण विभाग या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासला जात असून, पिसवली येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप व विद्यार्थी गुणगौरव समारंभ नुकताच पार पडला.समाजातील आर्थिक, दुर्बल, गरीब व गरजू अशा अनेक विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत, संस्थापक अध्यक्ष सतीश पेडणेकर, अनिल कोकाटे, शरद बिरामणी, मोहन फराकटे, सतबा दाभोळे, दत्ता पाटील, संजय बाळनाईक आणि शिव सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये गुण गौरव सोहळा पार पडला.
यावेळी गरजू 100 विद्यार्थ्यांना वह्या व शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच १० वी, १२ वी मधील विद्यार्थी व क्रीडा क्षेत्रामध्ये व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नामवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आल


