Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे आव्हान,


पर्यावरण पुरक श्री गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेस सहकार्य करावे      

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे आव्हान,  

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

यंदाचा श्री गणेशोत्सव पर्यावरण पुरक साजरा करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले. आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मूर्तीकारांना शाडु मातीचे विनामूल्य वितरण करण्यात आले, यावेळी उपस्थित मूर्तीकारांशी संवाद साधताना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी हे प्रतिपादन केले.महापालिका मुख्यालयात आज संपन्न झालेल्या या कार्यक्रमासमयी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, पर्यावरण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातील अनेक मूर्तीकार उपस्थित होते.

POP च्या वापाराबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना आपल्याला या अगोदरच आपणास प्राप्त झालेल्या आहेत आणि श्री गणेश मूर्ती बनविणेसाठी लागणारी शाडुमाती आपण उपलब्ध करुन देत आहोत. मूर्तीकारांनी देखील पर्यावरणपुरक मूर्ती वापराबाबत जनजागृती करावी, त्यांना जागा उपलब्ध करुन देणेबाबत महापालिका सहकार्य करेल, अशा शब्दात महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित मूर्तीकारांना आश्वासित केले. आयविनामुल्य शाडुमाती उपलब्ध करुन देण्याबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने एक चांगले पाऊल उचलले आहे. तथापि, ही शाडूमाती पुढील वर्षी श्री गणेशोत्सवापूर्वी किमान 6 महिने आधी उपलब्ध करुन द्यावी तसेच महापालिका आयुक्तांनी मूर्तीकारांसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, असे विचार उपस्थित मूर्तीकारांनी मांडलपर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मूर्तीकारांना त्यांच्या आवश्यकतेनुसार शाडू माती उपलब्ध करुन दिली जाईल अशी माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक मूर्तीच खरेदी करावी त्याचप्रमाणे विसर्जन देखिल पर्यावरण पूरकच करावे असे आवाहनही यावेळी केले.  


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.