दृष्टिहीन राज्यस्तरीय पावरलिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धा संपन्न
कलम भूमी , कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : दृष्टिहीन राज्यस्तरीय पावरलिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धा आठ जून रोजी नॅशनल कॉलेज बांद्रा पश्चिम येथे प्यारा ब्लाइंड असोसिएशन महाराष्ट्र व महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील दृष्टिहीन पॉवरलिफ्टर्सने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून ही स्पर्धा आपल्या सर्वांग सुंदर खेळाने व खिलाडवृत्तीने यशस्वीरित्या पार पडली.या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील दृष्टीहीन महिला व पुरुष खेळाडूंनी आपल्या सहभागांनी ही स्पर्धा गाजवली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्टेट पॉवरलिफ्टिंग महाराष्ट्राचे सेक्रेटरी संजय सरदेसाई व ब्लाइंअसोसिएशन महाराष्ट्राचे सेक्रेटरी पंकज चौधरी, अध्यक्ष नेहा पावसकर, खजिनदार मनोज कटारिया व युनिव्हर्सिटीचे कोच सुरेश चेडे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या स्पर्धेत दिव्यांग क्रीडा क्षेत्रातील जाणकार रवींद्र सकपाळ त्यांनी या स्पर्धेत 125 किलो वजनी गटात व अंशतः दृष्टीहीन p 12 या गटातून राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या सर्वोत्तम खेळाने सुवर्णपदक प्राप्त केले. ते स्वतः नवी मुंबई महानगरपालिकेत कबड्डी मार्गदर्शक म्हणून सुदृढ व दिव्यांग खेळाडू घडवत असून क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व अधीक्षक काशिनाथ गोलवड यांचे मार्गदर्शन व विजय शेलार यांच्या सहकार्याने दिव्यांगांच्या क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत.

