शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अल्पदरात शैक्षणिक साहित्य उपलब्ध
कलम भूमी कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण शहर व इतर परिसरातील सध्या सर्व शाळा शैक्षणिक वर्षाच्या तयारीला लागले असून सर्वच विद्यार्थांना प्रश्न पडतो कि, एवढ्या महागाईच्या काळात वह्या, शैक्षणिक साहित्य आणि पावसाळ्यासाठी लागणारी छत्री अथवा रेनकोट खरेदीसाठी लागणारे आर्थिक पाठबळ कसे आणायचे. यासाठी कल्याण शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण विधानसभा संघटक प्रमुख रुपेश भोईर यांनी कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कल्याण शहर परिसरातील व शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्या अगदी अल्प दरांत मुबलकपणे उपलब्ध करण्यांत आले आहे.यावेळी सर्वच विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, पेन, कंपास असे शैक्षणिक साहित्य अल्पदरात वाटप करण्यांत येत आहे. तसेच नामांकित कंपनींच्या छत्र्या व रेनकोटचेही अल्पदरात वाटप होत आहे. नागरिकांना अल्पदरात हे साहित्यउपलब्ध होत असल्याने नागरिकांनी रुपेश भोईर यांचे आभार मानत आहेत.
