हिंदुत्वाच्या मुद्दयावर कल्याणात शिंदे गट ठाकरे गट एकत्र
बकरी ईदच्या दिवशी नमाजच्या वेळी दुर्गाडी मंदिर सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी डीसीपींची घेतली भेट
शिंदे गटाच्या आमदारांसह ठाकरे गटाच्या उपनेत्यांचे स्पष्टीकरण
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : राज्यभरात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष पाहायला मिळत असताना, कल्याण मध्ये मात्र ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी आणि शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतली. निमित्त होते ते बकरी ईद निमित्त किल्ले दुर्गाडीवर घंटानाद आंदोलनाचे. बैठक संपल्यानंतर या दोघांनी देखील आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू म्हणूनच राजकीय पक्ष बाजूला सारून आम्ही एकत्रित पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी किल्ले दुर्गाडी येथे नमाज सुरू असताना दुर्गाडी देवीचं मंदिर देखील खुले असू द्या अशी मागणी पोलीस उपायुक्तांकडे केली
कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लीम या दोन्ही समाजाची धार्मिक स्थळे असून दोघांनीही आपले हक्क सांगितले आहेत. बकरी ईद निमित्त दोन धर्मामध्ये कोणतेही वाद होऊ नये यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळी मुस्लीम बांधव नमाज पठण करत असताना पोलिसांकडून हिंदु बांधवांना सकाळी दुर्गाडी किल्ल्यावर आरती व घंटानाद करण्याकरिता प्रवेश बंदी केली जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हि बंदी झुगारण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली 1986 सालापासून शिवसेनेने घंटानाद आंदोलन सुरु केले. तेव्हापासून दरवर्षी बकरी ईद निमित्त कल्याण मध्ये शिवसैनिक घंटानाद आंदोलन करतात.शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट दोघेही वेगवेगळे आंदोलन करतात. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी शिवसेना शिंदे गट, ठाकरे गटासह हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर, ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांच्यासह दोन्ही गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी बकरी ईद निमित्त मुस्लिम समाजाचे नागरिक नमाज अदा करत असतात या वेळेला मंदिर प्रवेश बंदी असते. आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 35 वर्षांपासून या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेकडून घंटानात आंदोलन सुरू आहे. ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडी मंदिरात जाण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आम्ही केली आहे. हिंदू म्हणून आम्ही एकत्र आलोत आमच्या सोबत इतर हिंदू संघटना देखील आहेत असे आमदार भोईर यांनी सांगितले.तर ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी देखील आम्ही हिंदू म्हणून एकत्र आलोत. आंदोलन मात्र आमच्या पक्षातर्फेच होईल. आमची मागणी बकरी ईदच्या दिवशी नमाज सुरू असताना मंदिर देखील खुले ठेवण्यात यावे ही आहे असे सांगितल

