Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

No title


दुर्गाडी किल्ल्याच्या संरक्षण भिंतीचा भाग कोसळला - आमदार विश्वनाथ भोईर ठेकेदारावर संतप्त ; शिवसेना स्टाईल धडा शिकवू , दिला इशारा

कलम भूमी,कल्याण : प्रतिनिधी

कल्याण शहराचा ऐतिहासिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या संरक्षण भिंतीचा मोठा भाग बुधवारी ४ मे २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास गोविंदवाडी बायपास परिसरात कोसळला. हे काम सुरू असतानाच केवळ काही मिनिटाच्या पावसानंतर ही दुर्घटना घडल्याने, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच कल्याण पश्चिमचे आमदार  विश्वनाथ भोईर आणि माजी नगरसेवक अरविंद मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेतले."पावसातही काम का सुरू ठेवले? एवढ्या मोठ्या प्रमाणावर भिंत कोसळली, जीवितहानी झाली असती तर जबाबदार कोण ?"  -  असा संतप्त सवाल आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच इतर दोन दिवसांमध्ये बकरी ईद निमित्त मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव नमाजसाठी  या ठिकाणी येणार असल्याने स्वभाव दुर्घटनेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली . कामाच्या दर्जाबाबत ठेकेदाराकडून मोठा हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत भोईर यांनी पुढे सांगितले की "कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित असून 

पीडब्ल्यूडी व पुरातत्व विभाग एकमेकांवर जबाबदारी टाकत आहेत. संबंधित ठेकेदार त्वरित हजर झाला नाही,तर शिवसेना स्टाईलने धडा शिकवू ." असा सज्जड इशारा आमदार भोईर यांनी दिला. यादरम्यान माजी नगरसेवक जयवंत भोईर, कासीफ तानकी ,माजी परिवहन सदस्य उप शहर प्रमुख सुनील  खारूक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते..  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.