रिक्षातून गांजा तस्करी करणार्यांच्या आवळल्या मुसक्या
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
परिमंडळ ३ कल्याण मध्ये 'गांजा' अंमली पदार्थ जप्त
कल्याण : कल्याण व डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणारे पेडलर यांच्यावर कारवाई करण्याकरीता परिमंडळ ३ कल्याण पोलीस उप आयुक्त यांच्या अंतर्गत महात्मा फुले चौक पोलीसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे.महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हददीत मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चिकनघर परिसरात हॉली कॉस शाळेच्या पाठीमागील मैदानामध्ये एक रिक्षा संशयीत रित्या उभी असल्याचे दिसल्याने पोलीसांनी त्यांना हटकले असता त्या रिक्षामधील इसम पळून जावू लागले. त्यांना पाठलाग करून ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी रिक्षा मध्ये गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आणला असल्याचे सांगीतले.या रिक्षाचा चालक फैजल अस्लम शेख वय ३१ वर्षे रा. भांडूप पश्चिम व त्याच्या सोबत असलेल्या अफसर सत्तार शेख वय ३६ वर्षे, रा. नागपुर यांच्या ताब्यातुन अंदाजे ६ किलो वजनाचा सुमारे 3 लाख रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली असून त्यांच्या विरूध्द महात्मा फुले चौक पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कामगिरी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांनी केली असून अशा प्रकारे परिमंडळ ३ कल्याण मध्ये अंमली पदार्थ विरूध्द कारवाई सुरू राहणार आहे.
