शिवसेना माजी नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
मोहन उगलेंनी केले विनयभंगाच्या आरोपांचे खंडन
कलम भूमी , कल्याण प्रतिनिधी,
पोलिसांनी शहानिशा करत कारवाई करण्याची केली मागणी
कल्याण : शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी बाजार पेठ पोलिसांनी माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कल्याण मधील एका महिलेने मानसिक त्रास देत शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा गुन्हा बाजारपेठ ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तर ज्या महिलेला मी ओळखत नाहीये तिला आज पर्यंत मी कधी पाहिले नाही त्या महिलेने माझ्या विरोधात काही समाजकंटकांना हाती घेऊन खोटा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या पंधरा वर्षापासून मी या प्रभागात नगरसेवक म्हणून काम करत आहे. सर्व पक्षातील लोकांना माहित आहे, की मोहन उगले असेल तर आपण जिंकू शकत नाही, म्हणून माझ्यावरती हा खोटा गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र असल्याचे मोहन उगले यांनी सांगितले.
