खडवली विभागातील आदिवासी वस्तीमध्ये ताडपत्री वाटप
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
सामाजिक बांधिलकी जपत सुयोग टेलिमॅटिक्स लिमिटेड, मुंबई यांचे डायरेक्टर शिवशंकर लातुरे यांच्या सौजन्याने खडवली परिसरातील फळेगाव आदिवासी वस्ती, बेलपाडा येथे गरजू नागरिकांना ताडपत्री वाटप करण्यात आले. तसेच खाकरवाडी जिल्हा परिषद शाळा येथेही ताडपत्री देण्यात आले.या उपक्रमासाठी भागुबाई जीवन प्रेरणा सामाजिक संस्था, फळेगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष मा. संजय गोमा जाधव यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. माजी चंद्रकांत भोईर, फळेगाव ग्रामपंचायत सदस्य महेश आगिवले , पंकज पाटील अशोक चौधरी, पत्रकार विलास भोईर, विराज जाधव यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.
पक्रमामुळे पावसाळ्याच्या तोंडावर आदिवासी वस्तीतील नागरिकांना दिलासा मिळाला असून, स्थानिकांनी उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.

