Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

प्रत्येक दिवस हा स्वयंप्रशिक्षणाचा/ अनुभवाचा दिवस असतो महापालिका आयुक्त अभिनव गोयल


     

 प्रत्येक दिवस हा स्वयंप्रशिक्षणाचा/ अनुभवाचा दिवस असतो 

महापालिका आयुक्त अभिनव गोयल

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी 

प्रत्येक दिवस हा स्वयंप्रशिक्षणाचा/ अनुभवाचा दिवस असतो आणि शाळांमध्ये ही संकल्पना रुजवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले ,कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ,  डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथील बालभवन येथे आयोजलेल्या निसर्गोत्सव कार्यक्रमात उपस्थित संबोधित करताना त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष  डॉ.पुरुषोत्तम काळे, महापालिकेचे माजी पदाधिकारी मंदार हळबे ,पर्यावरण विभागाचे उपायुक्त संजय जाधव, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, सहा.-आयुक्त हेमा मुंबरकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.

 निसर्गोत्सवात कलात्मक रीतीने प्रदर्शित केलेल्या वेगवेगळ्या झाडांबाबत, छायाचित्रांच्या प्रदर्शनाबाबत पर्यावरण दक्षता मंडळाचे अभिनंदन करत तुम्ही आमच्यासाठी ब्रँड अँबेसिडर आहात अशा शब्दात आयुक्तांनी प्रशंसा केली. पर्यावरण दक्षता मंडळांने डोंबिवलीतील काही जागा(spots) निश्चित करण्यात, त्या परिसरात महापालिकेसोबतच वृक्ष लागवड करण्याचा, हिरवाई निर्मितीचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. घराघरांतून  छोट्या ऍक्टिव्हिटी म्हणजे पाण्याची बचत, वस्तूंचा पुनर्वापर, प्लास्टिकचा कमीत कमी वापर या बाबी लहान मुलांपर्यंत पोहोचायला हव्यात असे ते पुढे म्हणाले. यावेळी या निसर्गोत्सवात सहभागी झालेल्या आणि सहकार्य करणाऱ्या लहान मुलांचा आणि इतर व्यक्तींचा मान्यवरांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली  शाईवाले यांनी केले.

आज आणि उद्या म्हणजे दि.८ जून रोजी डोंबिवलीतील बालभवन येथे आयोजिलेल्या या निसर्गोत्सवात  बागकाम कार्यशाळा( किचन गार्डन आणि फुलझाडे )सर्पमित्र गप्पा असे अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच पर्यावरण पूरक उत्पादनाचे स्टॉल्स आणि आणि आसपासच्या परिसरातील जैवविविधता दर्शवणाऱ्या निसर्ग फोटोंचे प्रदर्शनही लावण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.