ठाकरे बंधूंची युती भाजपाला गाडल्या शिवाय राहणार नाही – उपनेते विजय साळवी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंची युती भाजपाला गाडल्या शिवाय राहणार नाही अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी केली. हिंदी सक्तीचा जीआर राज्य सरकारने रद्द केल्या नंतर त्यांनी आपली भूमिका मांडली. फडणवीस सरकार जो जीआर काढला तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा होता. या धोरणात पहिली ते चौथी पर्यंत हिंदी सक्ती करण्याची कोणतीही तरतूद नाही, ती ५ वी पासून आहे. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंदी भाषिकांची मते मिळविण्यासाठी हा जीआर काढला. मात्र या विरोधात जेव्हा दोन ठाकरे एकत्र आले. 5 जुलै चा मोर्चा अतिविशाल निघेल अशी कुणकुण लागताच घाबरून फडणवीस सरकारने हा हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतला. हि सपशेल फडणवीसांची डरपोकगिरी असून त्यांचे फेल्युअर असल्याची टीका उपनेते विजय साळवी यांनी केली.
२०२० चा हा जीआर उद्धव ठाकरे यांनी फेटाळला होता. मुळातच शिवसेनेची स्थापनाच मराठीच्या मुद्द्यावर झाली असून, ठाकरे फमिली मराठीसाठी मतांचा विचार करत नाही. त्यामुळे यापुढे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रच राहणार, एकत्रच लढणार आणि भाजपाला गाडणार असे साळवी यांनी सांगितले.

