गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम!
राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीचा उपक्रम - आमदार व प्रशासनाच्या उपस्थितीत वितरण
कल्याण भूमी, कल्याण प्रतिनिधी,
राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील गरीब, गरजू आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रायते व रायते विभाग हायस्कूल येथे सकाळी ९:३० वाजता शालेय साहित्य वाटपाचा प्रारंभ झाला.
यानंतर नालोंबी येथील जिल्हा परिषद शाळा येथे सकाळी ९:५५ वाजता, तर टिटवाळा येथील मस्कळ येथील जीवन संवाद आश्रम येथे दुपारी ११ वाजता साहित्य वितरण करण्यात आले. त्यानंतर अंबरनाथ येथील शिवभक्त आश्रम शाळा लळवली येथे दुपारी ३:३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना नोटबुक (वह्या), पेन, छत्र्या, रेनकोट, स्टेशनरी साहित्य इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विशेषतः गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांना या माध्यमातून शैक्षणिक मदत मिळाली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशन कथोरे (मुरबाड) व आमदार विश्वनाथ भोईर (कल्याण) यांची उपस्थिती लाभली होती. यासोबतच भाऊ पाटील (उप जिल्हाधिकारी), गुजर साहेब (प्रांत अधिकारी), लोखंडे साहेब (कल्याण तहसीलदार), संजय भोये (BDO), कुमार साहेब (टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक) हे अधिकारीही कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व पत्रकार बंधू-भगिनींचा मोठा सहभाग दिसून येते,


