हॉटेल व्यवसायिकांना खंडणी मागणाऱ्या आर.टी.आय कार्यकर्त्याला अटक
खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांची कारवाई
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
कल्याण : हॉटेल व्यवसायिकांना खंडणी मागणाऱ्या आर.टी.आय कार्यकर्त्याला अटक करण्याची कारवाई खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या पथकाने केली आहे.खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर या कार्यालयाकडे एका हॉटेल व्यवसायीकाने तक्रारी अर्ज दाखल केला होता. या अर्जामध्ये नितीन घोले हा कल्याण परिसरातील हॉटेल व्यवसायिकांविरूध्द खोटया तक्रारी करण्यांची धमकी देवुन खंडणीची मागणी करीत असल्याचे नमुद केले होते. या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर येथील अधिकारी व अंमलदार यांनी २१ जुलै रोजी कल्याण पश्चिमेतील संतोष हॉटेल याठिकाणी सापळा रचून खंडणी मागणाऱ्या नितीन घोले वय ४९ वर्षे यास ५० हजारांची खंडणी घेताना रात्री २३:५५ वाजता ताब्यात घेण्यात आले आहे.या आरोपी विरूध्द महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा आणखी एक साथीदार फरार असल्याने त्याचा शोध सुरू आहे. या आरोपीस रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आला असता त्यास न्यायालयाने २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथक, ठाणे करीत आहे.आरोपी हा आरटीआय कार्यकर्ता असल्याचे व त्यास पोलीस व इतर शासकिय अधिकारी घाबरत असुन त्यास पैसे दिले नाही तर फिर्यादीस खोटया गुन्हयामध्ये अडकविण्याची धमकी देवुन खंडणी मागत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने अशाप्रकारे इतरही हॉटेल व्यवसायिकांकडुन खंडणी घेतली असल्याची शक्यता असुन तशी मागणी झाली असल्यास संबंधीतानी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे येथे सपोनि गोरे यांच्याशी ७५८८५२८७१४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे,
हि कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, सपोनि कृष्णा गोरे, पोहवा कानडे, शिंदे, हिवरे, पोना हासे, पोशि ढाकणे यांनी केली आहे.
