रिपब्लिकन सेनेचे दामू काउतकर यांचे तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण मागे
आयुक्तांकडून मध्यस्थीचे प्रयत्न
अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांचे आश्वासन,
आंदोलन उग्र होण्याचा इशारा दामू यांनी दिला,
कल्याण भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रकल्प बाधितांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन सेनेचे ज्येष्ठ नेते दामू काउतकर यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी ठामपणे सुरू होते न्याय मिळवण्यासाठी सुरू केलेल्या या शांततामय आंदोलनाला आता शहरभरातून जोरदार पाठिंबा मिळू लागला होता,
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी उपोषणस्थळी भेट देत दामू काउतकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना ऊसाचा रस देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यांनी यावेळी लेखी पत्र देत, काउतकर यांची मागणी योग्य असून त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.दामू काउतकर यांचे प्रकृती अस्वास्थ्याकडे लक्ष देत योगेश गोडसे यांनी महापालिकेचे अधिकृत प्रतिनिधित्व करत, "प्रकल्प बाधितांचे प्रश्न बीएसयूपी योजनेअंतर्गत विचाराधीन आहेत आणि त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल," असे स्पष्ट केले.दरम्यान, रिपब्लिकन सेनेचे कल्याण शहर अध्यक्ष आनंद नवसागरे हे देखील तीन दिवसांपासून उपोषणस्थळी उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत. त्यांनी सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले असून, "प्रकल्प बाधितांच्या हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत झगडत राहू," असा निर्धार व्यक्त केला.
महापालिकेच्या दिलेल्या लेखी आश्वासनानंतरही काउतकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, "जर हे आश्वासन केवळ औपचारिक ठरले आणि मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारू. प्रकल्प बाधितांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही."महापालिकेने आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतल्याचे संकेत मिळत आहेत, मात्र दामू काउतकर यांच्या निर्धारामुळे या विषयाकडे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले गेले आहे. प्रकल्प बाधितांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होणार आहे, अशी माहिती पत्रकारांना दामू काऊटकर यांनी दिली आहे,


