गुरुचरण शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई; विकासकावर गुन्हा दाखल
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
महापालिका आयुक्त अभिनव गोयल,आणि उप आयुक्त समीर भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली,9/आय प्रभागातील गुरुचरण शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई काल दिवसभरात करण्यात आली.
सदर कारवाईमध्ये शासकीय जलकुंभ बांधण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या २२ गुंठे जागेमध्ये अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या तीन खोल्या आणि कंपाउंड वॉल हटविण्यात आले. संबंधित विकासक जगदीश पाटील याच्यावर एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई सार्वजनिक हित लक्षात घेऊन पारदर्शकपणे राबविण्यात आली असून, जलसंचयन प्रकल्पासाठी मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


