NAMASTE योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कामगारांनी आपली नोंदणी (REGISTRATION) करुन घ्यावी
अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
मलनि:सारण वाहिन्यांची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा व पुनर्वसन यांसाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय तसेच गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने NAMASTE (National Action for Mechanized Sanitation Ecosystem) योजना महापालिका क्षेत्रातही राबविली जाते. आता ही योजना घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या कचरा वेचक कर्मचाऱ्यांसाठी देखील राबविली जाणार असल्याने, या योजनेचे लाभ मिळण्यासाठी जास्तीत जास्त कामगारांनी आपली नाव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी आज केले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली नागरीक तसेच या योजनेचे लाभार्थी यांच्यामध्ये जनजागृती होण्यासाठी महापालिकेच्या ऊंबर्डे प्रकल्पावर "NAMASTE दिवस " साजरा करण्यात आला ,यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी हे आवाहन केले
या योजनेचे लाभ प्राप्त होण्यासाठी कोणती कागदपत्रे व कार्यवाही करणे आवश्यक आहे.
याबाबतची माहिती उपस्थितांना देतानाच सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेने दिलेली संरक्षक साधने देखील आवर्जुन वापरावीत, असेही ते पुढे म्हणाले. यावेळी उपस्थित कचरा वेचक कर्मचाऱ्यांना "पीपीई कीट"चे वितरण करण्यात आले. यासमयी जनि/मनि विभागाचे कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, उप अभियंता अजित देसाई, सिटी कॉर्डिनेटर स्वाती कोरडे तसेच प्रकल्पावरील सुपरवायझर व कचरावेचक उपस्थित होते.या कार्यक्रमात सलाह फौंडेशनच्या लक्ष्मी नाईक,स्त्री मुक्ती संघटना आणि परिसर भगिनी विकास संघाच्या करुणा धेंडे यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केलेया योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, हेल्थ चेकअप, विमा संरक्षण, सामाजिक सुरक्षा योजना आणि पुनर्वसनासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. NAMASTE अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी, त्यांच्या कौशल्यविकासासाठी कार्यशाळा व सामाजिक सक्षमीकरणाच्या योजना राबविण्यात येत आहेत.

