Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

कायमस्वरूपी गटार बनविण्याच्या मागणीसाठी पिसवलीतील नागरिकांची

 

कायमस्वरूपी गटार बनविण्याच्या मागणीसाठी पिसवलीतील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

कल्याण : कल्याण पूर्वेतील पिसवली गावातील तसेच रामवाडी, शांतीनगर, मल्हारनगर झोपडपट्टी परिसर येथील सांडपाणी वाहून नेणारा मुख्य मोठा नैसर्गिक नाला आहे. याठिकाणी दरवर्षी पावसाळयापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून नालेसफाई केली जाते. परंतु सदर जमिन मिळकतीचे जागा मालक आणि बिल्डर यांनी कोणतीही अडचण नसताना तसेच आपल्या कार्यालयाकडून कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता स्वतःच्या मनमानीने या नाल्याचा प्रवाह मार्ग  बदली केला.

तसेच अगोदर पेक्षा नाल्याची रूंदी ही खूपच लहान केली. त्यामुळे मनमानी कारभारामुळे मागच्यावर्षी धनश्री कॉलनी, गुरुनाथ कॉलनी, ज्योर्तिलींग कॉलनी मधील सुमारे ३०० ते ४०० घरात पावसाचे पाणी शिरून पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ह्यावर्षी देखील नाला बंद केल्याने पुरपरिस्थिती झाली होती. याबाबत केडीएमसीकडे पत्रव्यवहार करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने येथील नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयावर धडक देत उपोषणाचा इशारा दिला.

    येथील जुना नैसर्गिक नाल्याचे योग्यरित्या कायमस्वरूपी बांधकाम करून पुर्ववत करावा. तसेच जोपर्यंत कायमस्वरूपी नाल्याचे बांधकाम होत नाही तोपर्यंत आपण सदर जमिन मिळकतीत कायदेशीररित्या बांधकाम परवानगी देऊ नये. लवकरात लवकर या नाल्याचे महानगरपालिकेतर्फे कायमस्वरूपी बांधकाम करून तेथील नागरिकांना होणाऱ्या पूरपरिस्थितीच्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी महेश भोईर यांनी अर्जाद्वारे केली आहे. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.