Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

कल्याण पूर्वेत डंपिंग ग्राउंडला नागरिकांचा तीव्र विरोध

कल्याण पूर्वेत डंपिंग ग्राउंडला नागरिकांचा तीव्र विरोध – आंदोलनात रस्त्यावर उतरले

  कलम भूमी ,  कल्याण प्रतिनिधी,

कल्याण : कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोड, वसंत वाटिका जवळील पालिकेच्या भूखंडावर निर्माणाधीन डंपिंग ग्राउंड प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी आज रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली.

शिवरेल चौक येथील आरक्षण क्रमांक ३३० वर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका घनकचरा एकत्रीकरण, कचरा प्रेसिंग, वाहतूक व कचरा गाड्यांचे पार्किंगसाठी प्रकल्प उभारत आहे. मात्र, हा प्रकल्प रहिवासी भागाच्या अत्यंत जवळ असल्याने स्थानिकांनी त्याला विरोध दर्शवला असून, हा प्रकल्प मानवी वस्तीत न करता अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागणी केली आहे.

आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रकल्पाची तात्काळ थांबवणूक व्हावी अशी मागणी केली.

या आंदोलनाला आम आदमी पक्षच्या जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांचा पाठिंबा असून, त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की,

"आरक्षण क्रमांक ३३० वर मलनिस्सारण, पाणी पुरवठा किंवा उद्यान उभारणे अपेक्षित होते. मात्र, मनपाने आरक्षणात बदल करून बेकायदेशीरपणे घनकचरा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा प्रकल्प नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचवणारा असून तो आम्ही कदापिही होऊ देणार नाही. विकासाला आमचा विरोध नाही, पण तो लोकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या मार्गाने होऊ नये."

स्थानिक नागरिकांचा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.