✨ सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ!
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
🧑💼 888 कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान!
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्ग 3 व वर्ग 4 मधील एकूण 888 सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला आहे.
ही योजना आयुक्त अभिनव गोयल यांच्या विशेष निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त वंदना गुळवे, सहा. आयुक्त सुषमा मांडगे आणि त्यांच्या कार्यतत्पर टीमच्या प्रयत्नातून अंमलात आणली गेली.
✅ लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची संख्याः
- 👨💼 वर्ग 3 चे 95 सेवानिवृत्त कर्मचारी
- 🧑💻 वर्ग 3 चे 386 कार्यरत कर्मचारी
- 👷♂️ वर्ग 4 चे 407 कर्मचारी
💬 यापूर्वी मार्च 2025 मध्ये वर्ग 4 चे 1934 कर्मचारी या योजनेचा लाभ घेतले होते.
📈 पुढील टप्प्यात वर्ग 1 व वर्ग 2 च्या अधिकारी वर्गासाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे.
💐 या योजनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

