दुबईतील मराठी सामाजिक संस्था एसकेजी फाउंडेशनचा ५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : दुबई येथील एसकेजी फाउंडेशन हया मराठी सामाजिक संघटनेच्या सेवेला ५ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने दुबई येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नोकरीच्या शोधात आलेल्या मराठी बांधवांसाठी आशेचा किरण आणि घरकाम करणाऱ्या महिलांपासून ते गरीब, अशिक्षितांपर्यंत – एसकेजी फाउंडेशनचे समर्पित कार्य दुबई येथे उल्लेखनीय आहे. या संस्थेने गेल्या पाच वर्षांत हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला आहे. दुबईतील या मंडळींना एसकेजी फाउंडेशन एक विश्वासार्ह आधार बनले आहे एसकेजी फाउंडेशन युएई मधील होतकरू महिलांच्या न्याय हक्का साठीं उभारली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नरुणे, साक्षी मोरे, सिद्धार्थ कांबळे, संतोष भस्मे, किशोर मुंढे, मिलिंद मानके यांच्या सह कार्यकारी मंडळी पुष्पा घुडेकर, अंबिका, जाफ़रीन, लीझा, प्रमिला पवार, रिता, शालिनी, मंगेश, सचिन कदम, प्रकाश पवार यांनी केले.
या कार्यक्रमाला मोहम्मद अली शारजा गवर्नमेंट, मेजर आदिल सलाह, दुबई गवर्नमेंट, राहुल तुळपुळे, सोमनाथ पाटील, अनिता महागडे, चंद्रशेखर जाधव, संदीप कड, सचिन कदम, अभिजित देशमुख, डॉ अनिल बनकर, सुलोचना मुंगे, सुनील जवाहर, सचिन जोशी, विठोबा अहिरे, सुशांत चिल्लाळ या सर्व दुबईतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी मोरे, उषा कदम व संतोष भस्मे, प्रशांत बेले यांनी केले.

