लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेच्या मागणील सरकार कडून न्याय मिळाला - रामदास यादव
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
बाजार समितीच्या जागेत पत्र्याचे शेड उभारण्याच्या कामाचा शुभारंभ
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत पत्र्याचे शेड उभारण्याच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला असून लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेच्या मागणील सरकार कडून न्याय मिळाला असल्याची भवान लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेचे सचिव रामदास यादव यांनी व्यक्त केली आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डात लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेचे पुर्वी शेड होते. याचे नूतनीकरण करून या जागेत पुनश्च पत्र्याचे शेड उभारण्यास राज्य शासन पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाने बाजार समिती सचिव संजय एगडे यांनी वरिष्ठांच्या आदेशाने कल्याण कृषी उत्पन्न बजार समितीच्या वतीने लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटने सोबत नोंदणीकृत दस्तऐवज दि. ९-७-२०२५ रोजी करुन दिलं आहे. त्यानुसार आज उभारण्यात येणाऱ्या पत्राच्या शेडसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थितांमार्फत भूमिपूजन करण्यात आले.
कल्याण शहरातील भाजीपाला व्यापारी क्षेत्रातील सर्वात जुनी व्यापारी संघटना लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटना ही नेहमीच शेतमालाचा व्यवसाय करणारे व्यापारी, शेतकरी ग्राहक यांच्या हितासाठी अनेक वर्षापासून काम करीत आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेस न्याय दिला त्याबाबत राज्य शासन, सबंधित वरिष्ठ अधिकारी, बाजारसमितीचे सचिव व प्रशासक यांचे रामदास यादव यांनी आभार मानले आहेत. दरम्यान भूमिपूजन प्रसंगी शासनाच्या आदेशाचा भंग करून अडथळा आणण्याचा बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला परंतु व्यापारी संघटनेने कायदेशीर कागदपत्रानुसार त्यांना परत पाठविले.
