Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन


 कल्याणमध्ये म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन महायुतीत वाद. 

शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा भाजपच्या माजी आमदारांवर प्रकरण चिघळविण्याचा केला आरोप

तर शिवसेना आमदार बिल्डरची वकिली करतात का ?भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांचा आमदार भोईर प्रतिप्रश्न

      कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

कल्याण : कल्याण पश्चिमेतील म्हाडा कॉलनीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि भाजपचे माजी आमदार यांच्यातील वाद आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय कलगी तुरा रंगला असल्याचे दिसत आहे.  भाजपचे माजी आमदार यांनी शिंदे गटाच्या आमदारावर रहिवाशांची फसवणूक आणि बिल्डरशी संगनमत केल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळीमाजी आमदारांनी त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार कपिल पाटील यांच्यावर जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवरील म्हाडा कॉलनी पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्रदहा ते 12 वर्षांचा मोठा कालावधी उलटूनहीसंबंधित विकासाकांनी अद्याप पात्र रहिवाशांना घरांचा ताबा दिलेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प वादाचा विषय बनला आहे.  भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रहिवाशांच्या बाजूने आवाज उठवला आहे आणि उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी हे प्रकरण विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्याकडे देत त्यांनी लक्षवेधी मांडली होती.

हे वृत्त कळताचशिवसेनेचे  आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषद घेत तीव्र आक्षेप व्यक्त केला आणि सांगितले कीगृहनिर्माणमंत्र्यांनी विधान परिषदेत या मुद्द्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या पार्श्वभूमीवरयेत्या काही दिवसांत या मुद्द्यावर एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवरभाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी म्हाडा कॉलनी पुनर्विकास प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. ते म्हणाले कीनरेंद्र पवार उपोषण करून जनतेची दिशाभूल करत आहेत.

 यावर उत्तर देताना माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले की, आमदार विश्वनाथ भोईर  हे बिल्डरच्या बाजूने पत्रकार परिषद आयोजित करत आहेत. त्यांची जनतेशी बांधिलकी नाही का?  जनतेने त्यांना मतदान केले आहे, की विकासकांनी निवडून दिले आहे? ते त्यांची बाजू घेत आहेत. नरेंद्र पवार यांनी केवळ शिवसेना आमदारावर टीका केली नाही तर त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार कपिल पाटील यांनी बिल्डरशी सहकार्य केल्याचा गंभीर आरोप केला. कपिल पाटील यांनी त्यांच्याशी झालेले मोबाईल संभाषण विश्वनाथ भोईर यांना दिलेजे नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटातील माजी नगरसेवक रवी पाटील आणि संजय पाटील यांच्या प्रभागातील हा प्रकल्प असून गेल्या 15 वर्षांपासून त्यांनी काय केलं असा देखील प्रश्न उपस्थित केला आ

तर यानिमित्ताने विविध चर्चांना उधाण आले असून म्हाडा पुनर्वसन प्रकलापातील बाधित सर्वसामान्य रहिवाशांची अपेक्षा अशी आहे कीकोणीही आम्हाला न्याय मिळवून द्या आमची हक्काची घरे द्या आमचा झालेला वनवास थांबवा आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचू.दरम्यान म्हाडा पुनर्वसन प्रकल्पा अंतर्गत 1600 सदनिका धारकांना वेगवेगळ्या दोन विकासकांकडून घरे मिळणार असून घरे मिळेपर्यंत घरभाडे विकासकांकडून मिळत नसल्याचे, तसेच दहा ते 12वर्षे होऊन देखील घरे देखील मिळत नसल्याने हवालदिल झालेल्याना त्यांची घरे कधी मिळणार ही प्रतिक्षा असून ,त्यामुळे  त्यांची साथ देत कोण खरा न्याय मिळवून देणार असे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.