४७८ कोटींचा महाघोटाळा – ४०० कुटुंबांची फसवणूक, विकासकावर तातडीने कठोर कारवाईची मागणी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
गेल्या १४ वर्षांपासून एका नामांकित विकासकाने "तीन वर्षांत घर देतो" अशी स्वप्नं दाखवत सुमारे ४०० नागरिकांची फसवणूक केली आहे. या घोटाळ्याचे आकडेच धक्कादायक आहेत – १५० कोटी रुपये बुकिंगद्वारे आणि ३२८ कोटी रुपये बँकेकडून घेतलेलं कर्ज, म्हणजे एकूण ४७८ कोटी रुपयांचा घोटाळा.
या विकासकाने:
- नागरिकांकडून बुकिंगच्या नावाखाली १५० कोटी गोळा केले.
- स्थानिक शेतकऱ्यांची वसाहतीची जमीन त्यांच्या नकळत बँकेत गहाण ठेवून ३२८ कोटींचं कर्ज उचललं.
- १४ वर्ष उलटून गेली तरी एकही इमारत पूर्ण केली नाही
४७८ कोटींचा महाघोटाळा – ४०० कुटुंबांची फसवणूक, विकासकावर तातडीने कठोर कारवाईची मागणी
. - संबंधित लोकांना फक्त खोटी आश्वासनं आणि तगादा दिला.
ही फक्त आर्थिक नव्हे, तर सामाजिक फसवणूक आहे.
माजी आमदार नरेंद्र पवार यांचा खुलासा:
माजी आमदार श्री. नरेंद्र पवार यांनी स्पष्ट सांगितलं की, “हा घोटाळा केवळ एक गुन्हा नाही, तर शेकडो कुटुंबांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं गेलं, घरे बांधली गेली नाहीत आणि प्रशासन, बँका आणि सरकारी यंत्रणा शांत का होत्या?”
आमच्या मागण्या:
- संबंधित विकासकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी.
- त्याच्याकडील संपत्ती त्वरित जप्त करून बुकिंगधारकांना नुकसानभरपाई द्यावी.
- बँक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्यात यावी.
- या प्रकल्पाचे काम सरकारने किंवा विश्वासार्ह संस्थेमार्फत पूर्ण करा,
या प्रकरणात ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा सर्व नागरिकांनी एकत्र येऊन न्यायासाठी लढा सुरू करावा. आम्ही लवकरच एक सर्वसाधारण सभा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करू.
न्यायासाठी चिकणघर येथील शांतिदूत सोसायटीच्या सभासदांचे विकासकाच्या विरोधात आमरण उपोषण सुरु, रहिवाश्यांना फसवणाऱ्या घोटाळेबाज शितोळे बिल्डर व त्याचा पार्टनर चेतन सराफ तसेच त्यांना साथ देणाऱ्या सोसायटीतील सभासद शिवाजी बागवे आणि नवाब तडवी यांच्यावर तात्काळ अटकेच्या कारवाईची मागणी मा. मुख्यमंत्री व मा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तात्काळ कारवाईच्या आदेशानंतरही ठाणे पोलीस आयुक्त कारवाई का करत नाहीत, त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे? - माजी आमदार नरेंद्र पवार शांतीदूत गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकासाच्या कामात घोटाळा करणाऱ्या आणि राहिवाश्यांची दिशाभूल करणाऱ्या अवंती ग्रुप एल एल पी चे विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ यांच्या विरोधात तात्काळ कारवाईचे आदेश असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्याच्या निषेधार्थ भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शांतीदूत सोसायटी रहिवाशांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले की, तीन वर्षांत घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले आणि आज १४ वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांना घरे बांधून दिली नाहीत. तसेच येथील रहिवाश्यांना अंधारात ठेऊन त्यांची जमीन चुकीच्या पद्धतीने बँकेकडे गहाण ठेऊन त्यावर ३१८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हे प्रोजेक्ट दाखवून त्या आधारे ४०० जणांची बुकिंग घेतली. त्या ४०० लोकांच्या बुकिंगच्या लोनच्या हप्त्याच्या माध्यमातून जवळपास १५० कोटी रुपये विकासक श्रीकांत शितोळे व त्यांच्या भागीदाराच्या खात्यात जमा झाले. पण आज 14 वर्षे उलटून गेल्यानंतरही आजतागायत त्याने इमारत बनवून दिली नाही. म्हणजे ३१८ कोटी व बुकिंगचे १५० कोटी म्हणजे एकूण ४६८ कोटी रुपयांचा घोटाळा या विकासकाने केलेला आहे. या विकासकाने येथील रहिवाश्यांची फसवणूक केली, बँकेची फसवणूक केली. म्हणून आमची मागणी आहे की, विकासक श्रीकांत शितोळे व त्यांचे सहकारी चेतन सराफ यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक केली जावी तसेच त्यांना साथ देणाऱ्या सोसायटीतील सभासद शिवाजी बागवे आणि नवाब तडवी यांना सुद्धा तात्काळ अटक केली जावी. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, येथील राहिवाश्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आमरण उपोषण असेच सुरू राहणार आहे, असा इशारा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिला.ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही आमचे निवेदन दिले, तेव्हा त्यांनी स्वतः ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला व तात्काळ कारवाईचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याला आज बरेच दिवस उलटून देखील ठाणे पोलीस आयुक्तांनी आजतागायत त्यावर कारवाई केलेलीं नाही, त्यासाठी त्यांचा जितका निषेध करावा तितका थोडाच आहे. मुख्यमंत्री व ग्राहमंत्र्यांचे ऐकत नाहीत, उपमुख्यमंत्र्यांचे ऐकत नाहीत, पोलीस प्रशासनावर एवढा कोणता दबाव आहे, असा सवाल नरेंद्र पवार यांनी या प्रसंगी उपस्थित के

