काँग्रेस नेते संजय दत्त यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांचाजल्लोष, महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख प्रभारी श्री. संजय दत्त यांचा वाढदिवस ७ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण-डोंबिवली, ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
संजय दत्त हे महाराष्ट्रात एक ओळखले जाणारे सशक्त राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत. गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ विधान परिषद सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कार्यक्षमता, पक्षनिष्ठा व जनतेशी असलेल्या जवळिकतेमुळे आपली खास ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामाची आवड, सातत्य आणि पक्षासाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कल्याना तील निवासस्थानी केक कापून कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी, पत्रकार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संजय दत्त यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्ष संघटन आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.ते म्हणाले, "पक्षाच्या मजबुतीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी आतापासून सुरू करा. दर आठवड्याला बैठक घ्या आणि लोकांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवा."या प्रसंगी ठाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पोटे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आणि पक्ष कार्याचा आढावा घेतला.
संजय दत्त साहेबांचा वाढदिवस हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा आणि पक्षासाठी पुन्हा जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा ठरला.



