महापारेषणाची विद्युत लाईन तुटल्याचा महावितरणाला ताप
कलम,भूमी कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : महापारेषणाची पडघा-मोहने टॉवर लाईन गाळेगाव येथे सकाळी तुटल्याने त्याचा महावितरणला ताप बसल्याने कल्याणातील काही परिसर, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, परिसरातील विघुत ग्राहकांना विघुत पुरवठा ठप्प झाला. विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा फटका घरगुती विघुत ग्राहकासह व्यवासायिक विघुत ग्राहकांना बसला आहे.
महापारेषणच्या पडघा- मोहने हाँयटेशन् टाँवर लाईन (100 केव्ही) गाळेगाव परिसरात सोमवारी सकाळी 10.30वा.सुमारास तुटल्याने महावितरणाच्या कल्याणातील काही परिसर, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथील 90 हजार विद्युत ग्राहकांचा विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने कामकाजाच्या पहिल्याच दिवशी व्यवसायिक विद्युत ग्राहकापासून घरगुती विघुत ग्राहकांची वीजेवर अवलंबून असणारे कामकाज ठप्प झाले. महापारेषणने विद्युत लाईन तुटल्याने जोडण्याचे काम सुरू केले तरी सात तास होऊन देखील विघुत पुरवठा सुरळीत सुरू झाला नव्हता.
महावितरणचे कल्याण परिमंडळ मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी प्रसिद्धी माध्यामांना सांगितले की, अंबरनाथ येथील परिसरातील महावितरण सर्व्हिस सेंन्टरला महापोरषण लाईनचा कन्डक्टर ट्राप झाला असून त्याचा फटका महाविरणला बसला आहे. एक एक तास रोटेशन करीत खंडित झालेल्या परिसरातील विद्युत पुरवठा सुरू ठेवत ग्राहकांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे. महापारेषण चे दुरूस्ती काम 3 वाजेपर्यंत होईल .
