महापालिकेतर्फे सद्भावना दिनी घेतली शपथ व राजीव गांधी स्मृतिदिन साजरा.
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने आज सद्भावना दिनानिमित्त महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सद्भावना दिवसाची शपथ घेण्यात आली . त्याचप्रमाणे आज राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यासमयी महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

