मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिमेत 75 सामाजिक उपक्रम – माजी आमदार नरेंद्र पवारांचा संकल्प
सेवा पंधरवड्यात महाआरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद; भाजप नेत्यांचा एकजुटीचा संदेश
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल 75 सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने प्रभाग क्र. 7 मध्ये आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या शिबिरात 300 नागरिकांनी सहभाग नोंदवून मोदींवरील लोकांचा विश्वास अधोरेखित केला. रक्तदाब, मधुमेह, हाडांची तपासणी, सोनोग्राफीसह विविध चाचण्या आणि मोफत चष्मे वाटप या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली.
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या आवाहनानुसार कल्याणमध्ये सेवा पंधरवडा जोरात राबवला जात आहे. “मोदी हे फक्त पंतप्रधान नाहीत तर देशाचे खरे जनसेवक आहेत. त्यांचा आदर्श घेत प्रत्येक कार्यकर्त्याने समाजासाठी झटले पाहिजे,” असे प्रतिपादन पवार यांनी यावेळी केले.
भाजपची ताकद दाखवणारी उपस्थिती
या कार्यक्रमाला भाजपचे जुने कल्याण
मंडल अध्यक्ष अमित धाक्रस, महिला मोर्चा अध्यक्षा हेमलता पवार, माजी नगरसेवक संदीप गायकर, महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा, डॉ. पंकज उपाध्याय आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नूतन शिक्षण संस्थेने दिलेल्या सहकार्याबद्दल पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
राजकीय संदेश स्पष्ट!
75 सामाजिक उपक्रमांच्या संकल्पातून नरेंद्र पवार यांनी स्थानिक राजकारणात आपली उपस्थिती पुन्हा ठळकपणे दर्शवली आहे.
मोदींचा प्रभाव, रविंद्र चव्हाण यांचे नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचा उत्साह – या त्रिसूत्रीवर भाजप कल्याणमध्ये पुढील निवडणुकीसाठी सज्ज होत असल्याचे संकेत या कार्यक्रमातून मिळा


