वॉर्डरचनेवरून राजकीय वाद – आयोगाकडे तक्रारींचा पाऊस
राजू रणदिवे,
अध्यक्ष कल्याण शहर आर पी ई,आठवले
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
महापालिकेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या वॉर्डरचनेवरून प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, राजकीय पक्ष आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे.
सध्याची वॉर्डरचना 2011 च्या मतदार आधारावर करण्यात आली आहे. गेल्या 14 वर्षांत शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली, नवीन वसाहती उभ्या राहिल्या, परंतु त्याचा विचार या रचनेत झालाच नाही. परिणामी, काही वॉर्डांमध्ये मतदारसंख्या मर्यादेपेक्षा दुप्पट तर काही ठिकाणी अत्यल्प असल्याचे समोर आले आहे.
यामुळे स्थानिक नागरिकांना न्याय मिळणार का? ही शंका उपस्थित होत आहे. राजकीय पक्ष आता निवडणूक आयोगावर थेट पक्षपातीपणाचे आरोप करत आहेत. अनेक पक्षांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर रचना दुरुस्त केली नाही तर ते आंदोलन उभारतील.
“निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांचे प्रतिनिधित्व समान असावे, हा लोकशाहीचा गाभा आहे. पण महापालिकेच्या वॉर्डरचनेत सरळसरळ अन्याय झाला आहे,” असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला.
स्थानिक नागरिकांच्या मते, 2011 चा आधार आजच्या वास्तवाशी विसंगत आहे. वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत सत्ताधारी गटाचा लाभ होईल अशा पद्धतीने वॉर्डरेषा आखण्यात आल्या आहेत असा संशय बळावला आहे.
निवडणूक आयोगाने या तक्रारींवर तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील काळात वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे