गणेशोत्सव 2025 : महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याची जनजागृती मोहीम
कलम भूमी,कल्याण प्राधिनिधी,
गणेशोत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि जनजागृतीसाठी उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला. दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 8:45 ते 9:15 या वेळेत माननीय अप्पर पोलीस आयुक्त (सो. पूर्व प्रादेशिक विभाग) तसेच परिमंडळ-3 चे पोलीस उपायुक्त यांच्या आदेशानुसार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी सार्वजनिक गणेश मंडपांना भेट देऊन नागरिकांमध्ये सायबर सुरक्षितता, वैयक्तिक सुरक्षा आणि अमली पदार्थाच्या धोक्याबाबत जागृती घडवली.
या उपक्रमाचे समन्वय व सूत्रसंचालन सौ. सुप्रिया कुलकर्णी डोंबिवली यांनी केले. पोलीस स्टेशनचे एपीआय श्री. हुंबे, परिमंडळ-3 कार्यालयातील अधिकारी राठोड (मपोहवा/6813), बाचकर (मपोना/7590), लगस (पोशि/7759), गोपनीय विभागातील हवालदार महाजन (4233) व माळी (5317) यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
भाविकांना डायल 112, 1090, 1098, 1930, 1945 या हेल्पलाईन क्रमांकांची माहिती देण्यात आली. महिलांचे, लहान मुलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या या सेवांमुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.
खालील गणेश मंडळांना भेट देऊन हा उपक्रम पार पाडण्यात आला:
- कल्याणचा राजा गणेशोत्सव मंडळ, चिकनघर
- बाळ क्रीडा मंडळ, मोठा म्हसोबा मैदान
- लहान म्हसोबा मैदान गणेशोत्सव मंडळ, संपदा हॉस्पिटल समोर
- जलाराम सोसायटी गणेशोत्सव मंडळ, पौर्णिमा चौक
या उपक्रमाद्वारे भाविकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद उमटला. पोलीस दलाने दाखविलेली जनजागृती, दक्षता आणि नागरिकहिताची बांधिलकी यामुळे गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत व आनंदोत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यासाठी भक्कम पायाभूत तयारी झाल्याचे दिसून आले.
माननीय सविनय सादर,
बी. एस. परदेशी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, कल्याण

