कडीएमसीच्या तात्काळ कारवाईमुळे सर्पदंशग्रस्त दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील तत्परतेमुळे पुन्हा एकदा जीव वाचला आहे.
दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता प्राणी बोईर (वय ४ वर्षे) आणि श्रुती ठाकूर (वय २३ वर्षे) या दोघांना सर्पदंश झाल्याने शास्नीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच वैद्यकीय अधिकारी स्वतः रुग्णालयात हजर राहून तपासणी व उपचार सुरू केले.
प्राथमिक तपासणीत करेत (Krait) सापाचा दंश झाल्याचे स्पष्ट झाले. तातडीने रुग्णांना अँटी स्नेक व्हेनम (Anti Snake Venom) इंजेक्शन देण्यात आले. ४ वर्षीय प्रणावी भाईर व श्रीमती श्रुती ठाकूर वय 23 वर्ष या दोन जणांचे प्राण स्थितीत तातडीने PICU मध्ये हलवण्यात आले. आवश्यक सर्व तपासण्या (BT/CT व इतर) करून उच्चस्तरीय उपचार सुरू करण्यात आले.
यानंतर सकाळी ६.४५ वाजता दोन्ही रुग्णांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आधुनिक सिव्हिल रुग्णालयात हलवून विशेष तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू ठेवले.
महत्वाचे म्हणजे, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत २४७ सर्पदंशग्रस्त रुग्णांवर केडीएमसी आरोग्य विभागाने यशस्वी उपचार केले आहेत.
यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात नेहमीच अँटी स्नेक व्हेनमचा साठा उपलब्ध ठेवला जातो.
