Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

समाज परिवर्तनाचा प्रेरणादिन


ज्ञान, समता आणि न्यायाचा अखंड दीप

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती कल्याण-डोंबिवलीत उत्साहात साजरी

              कलम भूमी,संपादक,गोपाल शर्मा,

कल्याण : भारतीय समाजाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा अमूल्य संदेश देणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि कोट्यवधी वंचितांच्या आशेचा किरण ठरलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत अत्यंत उत्साह, अभिमान आणि कृतज्ञतेच्या भावनेने साजरी करण्यात आली.

महापालिका मुख्यालयात महापौर हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्पसुमने अर्पण करत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी शब्दांत डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांची आजही असलेली प्रासंगिकता अधोरेखित केली. त्यांच्या विचारांनीच भारताला लोकशाहीची खरी दिशा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.महा पालिका सामान्य प्रशासन च्या उपायुक्त वंदना गुळवे दीदी,पालिका सदस्य रमेश जाधव,सचिव किशोर शेळके,अभियंता प्रशांत भागवत,जगदीश कोरे साहेब,संदीप तांबे सह आ,प्रीती गाडे,क प्रभाग अधिकारी धनंजय थोरात,शिक्षण अधिकारी विजय सरकटे भरत बुळे,सह,जनसंपर्मक अधिकारी सुमित बयोत,आदि कर्मचारी अधिकारी वर्गाने हजेरी लावली होती,

शहरभर अभिवादनाचा सन्मानाचा वर्षाव

कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातही महापौर आणि आयुक्त यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

डोंबिवली विभागात उपमहापौर राहुल दामले यांनी जुन्या विभागीय कार्यालयाजवळील पुतळा तसेच ६/फ प्रभाग कार्यालयातील तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बाळा साहेब चव्हाण,सह आयुक्त प्रसाद ठाकूर,सह आयुक्त राजेश सावंत यावेळी महापालिकेचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच कल्याण पूर्वेतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ५/ड प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरात सभागृहनेते वरुण पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.महा पालिका अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे,व सह आयुक्त उमेश यमगर व इतर मान्यवर या कार्यक्रमालाही अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विचारांचा जागर — कृतीतून अभिव्यक्ती

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या आचरणात उतरवण्याची गरज आहे, अशी भावना सर्व मान्यवरांनी व्यक्त केली.

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा मंत्र आजही समाजाला प्रेरणा देत आहे.

समाज परिवर्तनाचा प्रेरणादिन

ही जयंती केवळ औपचारिकता नसून सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारा दिवस असल्याचे अधोरेखित करत, महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नागरिकांनीही मोठ्या श्रद्धेने सहभागी होत बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन केले.ज्ञान, समानता आणि न्यायाचा दीप प्रज्वलित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे — हेच बाबासाहेबांच्या जयंतीचे खरे सार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.