Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

हर घर तिरंगा


 ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा; घराघरावर तिरंगा फडकवा – रवींद्र चव्हाण

             कलम भूमी. कल्याण प्रतिनिधी 

मुंबई : देशाचा स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर आला असताना भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला गेला पाहिजे, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. राष्ट्रध्वजाप्रती आदर, अभिमान आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘हर घर तिरंगा’ हे केवळ एक अभियान नसून देशभक्तीची भावना जनमानसात अधिक दृढ करणारा राष्ट्रीय उत्सव आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने या अभियानात सहभागी होऊन स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवावा, असेही चव्हाण यांनी सांगितले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी आपल्या परिसरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा व्यापक प्रसार करावा, घराघरात तिरंगा फडकवण्यासाठी जनजागृती करावी आणि स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

“घरावर तिरंगा, मनात राष्ट्राभिमान” या भावनेतून प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे, असा संदेश रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.