Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

. स्वेच्छा सेवा निवृती,

 


तीस वर्षांच्या निष्कलंक सेवेनंतर सुभाष ठाकरे स्वेच्छा निवृती प्रामाणिकपणा आणि तीस वर्षांच्या निष्कलंक सेवेनंतर सुभाष ठाकरे स्वेच्छा निवृती प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श निर्माण

सफाई कामगार ते महापालिका सचिव कार्यालया पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास 


        कलम भूमी,गोपाल शर्मा,
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सेवेत तब्बल ३० वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यदक्षतेने काम करून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणारे महापालिका कर्मचारी सुभाष ठाकरे हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी विविध विभागांत जबाबदारी सांभाळताना आपल्या कामातून प्रामाणिकपणा, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचा एक नवा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

महानगरपालिकेतील सफाई कामगार म्हणून आपल्या सेवेला सुरुवात करणारे सुभाष ठाकरे यांनी आपल्या मेहनतीच्या आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर विविध विभागांत काम करत महापालिका सचिव पदापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. काँग्रेस गटनेते कार्यालय, भाजप कार्यालय तसेच महापालिकेच्या अन्य महत्त्वाच्या विभागांत काम करताना त्यांच्यावर सोपविण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली.

विशेष म्हणजे, पद कोणतेही असो अथवा कामाची जबाबदारी कितीही मोठी असो, प्रत्येक कामाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत ते पूर्ण करण्याची त्यांची कार्यपद्धती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. तीस वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण निरोप दिला.

या विशेष प्रसंगी पत्रकार ऐकता संघाच्या वतीने सुभाष ठाकरे यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करत पत्रकार ऐकता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पत्रकार ऐकता संघाचे तोषेश शुक्ला, कलीम शेख, गोपाल शर्मा, सुभाष शेंडगे, सुभाष पटनाईक, जितेंद्र कानडे, राजू कौतकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, महापौर, महापालिका सचिव किशोर शेळके, सहाय्यक आयुक्त तसेच अधिकारीवर्ग उपस्थित होता. उपस्थित मान्यवरांनी ठाकरे यांच्या सेवाभावी वृत्तीचे आणि कामातील प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक केले.

सेवानिवृत्ती म्हणजे केवळ नोकरीचा शेवट नव्हे, तर आपल्या कार्यातून निर्माण केलेल्या विश्वासाची आणि आदर्शाची पुढील पिढीकडे सोपवलेली अमूल्य शिदोरी असते. सुभाष ठाकरे यांनी सफाई कामगार ते महापालिका सचिव असा प्रवास करताना आपल्या कर्तृत्वाने हे सिद्ध करून दाखवले आहे. तीस वर्षे एकाच संस्थेत निष्ठेने सेवा बजावताना त्यांनी निर्माण केलेली कार्यप्रतिमा ही निश्चितच महापालिकेतील नव्या कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

त्यांच्या सेवानिवृत्तीने महापालिकेतील सहकारी आणि मित्रपरिवाराला एका जिव्हाळ्याच्या सहकाऱ्याची उणीव जाणवणार असली, तरी त्यांनी आपल्या कार्यातून मिळवलेला सन्मान आणि माणसांची जोडलेली नाती हीच त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेची खरी कमाई असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. निर्माण

.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.