केळीच्या पानांच्या वादातून एकाची हत्या
बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला केली अटक,
कलम भूमि, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : केळीच्या पानावरुन झालेल्या वादात कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका विक्रेत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात विक्रेत्याचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे. बाजारपेठ पोलिसांनी आरोपी चिराग सोनी याला अटक केली आहे.
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिमनलाल कालरा आणि त्याचा मुलगा कार्तीक कालरा हे केळीची पाने विकण्याचा व्यवयास करतात. या बाजारात चिराग साेनी नावाचा तरुण देखील केळीच्या पानाचा व्यवसाय करतो. आज रविवारी सकाळी 8.30 वा.च्या सुमारास एपीएमसी मार्केट येथे केळीचे पान विक्रेता आरोपी चिराग राजकुमार सोनी वय 21 वर्ष व केळीचे पान विक्रेता मयत इसम चमनलाल नंदलाल कारला वय 55 वर्ष यांनी जळगाव येथून केळीच्या पानाचे बंडल मागविले होते. त्यातील चार पानाचे बंडल हे मयताचे होते व एक पानाचा बंडल हा आरोपी इसमाचा होता.
मयत इसम याने पाचही केळीच्या पानाचे बंडल ताब्यात घेऊन विक्री करता नेले. आरोपी इसम यास एक केळीच्या पानाचा बंडल मयत इसम याने न दिल्याने त्यांचे त वाद होऊन आरोपी इसम याने मयत चमनलाल कारला यांना कैचीच्या साह्याने छातीत पोटावर मारून जीवे ठार मारले. तसेच मदती करता आलेले मयताचा मुलगा कार्तिक कारला वय 22 वर्ष यांनाही कैचीच्या साह्याने पोटावर हातावर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. पत्नी नीतू कारला इस हातावर मारहाण करून किरकोळ जखमी केले.
याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपी चिराग सोनी याला लगेच अटक केली. चिराग सोनीच्या विरोधात या आधीही गुन्हे दाखल आहेत. हल्ल्याच्या वेळी चिराग हा नशेत होता. बाजार समितीच्या आवारात नशेचा वापर जोरात सुरु आहे. या बाजारात जे वाद हाेतात ते नशेबाज करतात. मात्र एका विक्रेत्याची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला केली अटक