हेलपिंग हँड सामाजिक संस्थेची तहानलेल्या गावाला पाण्याची मदत,
कलम भूमि, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : माळशेज येथील साकुर्ली गाव भीषण पाणी टंचाईचा सामना करत असून तहानलेल्या या गावाला कल्याणमधील हेलपिंग हँड सामाजिक संस्थेने पाण्याचा टँकर मागवून पाण्याची मदत केली आहे.
हेलपिंग हँड सामाजिक संस्थेचे सचिन राउत यांना माळशेज येथील साकुर्ली या गावातून व्हिडीओ आला गावात पाण्यावाचून व्यकुळ आहे. महिला विहिरीवर संध्याकाळी 4 वाजता पाण्यासाठी नंबर लावतात शेवटचा नंबर पहाटे 4 वाजता लागतो आणि विहिरीत पाणी फक्त एक वेळेला एक डब्बा शिल्लक. 7 किलोमीटर गावापासून लांब दगडातून हांडे घेऊन महिला जीव घेणा प्रवास करत आहे. तेव्हा हेलपिंग हँड सामाजिक संस्था दुपारी 4 वाजता निघाली जमा झालेली मदत घेवून टँकर मागवून संध्याकाळी 6 वाजता महिलांना पिण्याचे पाणी पूरवले. यामुळे महिलांना सुखाची झोप मिळाली प्यायला स्वच्छ पाणी मिळालं.
यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन टँकर साठी शक्य होईल ती मदत करावी. शक्य होईल त्यांनी टँकर पुरवण्यासाठी शक्य होईल ती मदत करा असे आवाहन सचिन राउत यांनी केले आहे. संपर्क : 8898235366

