आपल्या शिक्षणाने राष्ट्रीय कार्यात योगदान देता आले पाहिजे - डॉ. सुहास पेडणेकर
भारतीय शिक्षण मंडळाचा ५६ वा स्थापना दिवस,
कलम भूमि, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : समाजासाठी शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे, शिक्षणामुळे स्वतःचा शोध घेणे सुलभ होते, आपल्या शिक्षणाने राष्ट्रीय कार्यात योगदान देता आले पाहिजे असे मत अखिल भारतीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. सुहास पेडणेकर यांनी येथे व्यक्त केले. भारतीय शिक्षण मंडळाचा ५६ वा स्थापना दिवस पूर्वेकडील बाबा बोरसे महाविद्यालय येथे सोमवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला
यावेळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आर. के. शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष डॉ. दौलत सिंह पालीवाल उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हीना पुरोहित यांनी सादर केलेल्या ध्येय मंत्र आणि ध्येय श्लोकाने झाली. पाहुण्यांचे स्वागत प्रा. विजयेंद्र सिंघम यांनी तर प्रास्ताविक प्रा. जितेंद्र महाजन तर सूत्रसंचालन संयोजक उमाकांत चौधरी यांनी केले. कोणतीही वेळ आली असता घाबरून न जाता त्या वेळेला सामोरे जात लढण्याचा सल्ला देत प्रत्येक काम वेळेत पूर्ण करण्यासाठी पर्यंत केला पाहिजे असे डॉ. पालीवाल यांनी उपस्थितांना सांगितले.


