पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी, धरणे आंदोलन,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचेअध्यक्ष मा.श्री.हर्षवर्धन सकपाळ साहेबांच्या आदेशावरून काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणा विरोधात आवाज उठवित असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या सोनियाजी गांधी आणि देशाचे विरोधी पक्ष नेते श्री राहुलजी गांधी यांना सूडबुद्धीने त्रास देत आहेत त्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर धरणे आंदोलन करण्यात आले...
या वेळी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली..
सदर आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण, कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री सचिन पोटे आदी काँग्रेस पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला तथा पुरुष कार्यकर्ते उपस्तिथ होते,,,


