Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केली उल्हास नदी व नाले सफाई चीं पाहणी,

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केली उल्हास नदी व नाले सफाई चीं पाहणी, 

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

महापालिका आयुक्‍त अभिनव गोयल यांनी आज कल्याण परिक्षेत्रातील उल्हास नदी व कल्याण (पश्चिम) येथील नाले साफ-सफाईचा पाहणी दौरा केला. सदर पाहणी दौऱ्या समयी कल्याण डोंबिवली महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने  करण्यात येणाऱ्या उल्हास नदी तसेच महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या (मान्सूनपूर्व) कल्याण पश्चिमेतील नाले साफ-सफाईच्या कामाची पाहणी केली . तसेच उल्हास नदीतील जलपर्णीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पाहणी दौऱ्या समयी दिली.

उल्हास नदीमध्ये औद्योगिक कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने नाल्यांमधील जलपर्णी वाढल्यामुळे प्रदूषित होते म्हणून यावर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून उल्हास नद पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. 

या दृष्टीकोनातून महानगरपालिकेने नियोजन सुरु केले असल्याबाबत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले आहे.

मोहने व गाळेगाव येथील उल्हास नदीला मिळणाऱ्या नाल्यांची पाहणी करण्यात आली,उल्हास नदी मधील जलपर्णी काढण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मार्फत सुरू आहे.

नालेसफाई त्वरीत सुरु करणेबाबत संबंधित अधिकाऱ्‍यांना दिले सक्त निर्देश 

आयुक्त महोदयांनी सदर बाबतीत पुढील उपाययोजना करण्याच्या दृष्टीने डी.पी.आर.करणे बाबत संबंधितांना निर्देशित केले व लवकरात लवकर डि.पी.आर.तयार करून शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येईल असे सांगितले.

तद्नंतर मा.आयुक्त महोदय यांनी "अ" प्रभागातील लहुजी नगर येथील रस्त्यावरील झोपडपट्टी व चाळीतील सांडपाणी व्यवस्थेची पाहणी केली, तसेच अंबिकानगर येथील नालेसफाईच्या प्रस्तावित कामाबाबत पाहणी केली.

त्यानंतर "ब" प्रभागातील अनुपम नगर येथील नाला व चिकन घर येथील नाल्याची पाहणी केली. घनकचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे सुरू राहण्याच्या दृष्टीने व नाल्यात कमीत कमी कचरा जाईल असे होण्याच्या दृष्टीने आयुक्त महोदयांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील तसेच "ब" प्रभागाचे सहा.आयुक्त प्रिती गाडे यांना याबाबत डीप क्लिनिंग करणे बाबत निर्देशित केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त अतुल पाटील, प्रसाद बोरकर, संजय जाधव, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, शैलेश मळेकर, योगेश गोटेकर, 2/ब प्रभागाच्या सहा.आयुक्त प्रिती गाडे, 1/अ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रमोद पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.