Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

पिवळसर पाणी उकळून, गांळुन प्यावे, महा पालिकेचे आवाहन,

 

कलम भूमी, विशेष प्रेतिनिधी,

पिवळसर पाणी उकळून, गांळुन प्यावे, 

महा पालिकेचे आवाहन,

पाणी पिवळसर रंगाचे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे . केडीएमसी प्रशासनाने पाण्यावर केडीएमसीच्या जलशुद्धीकरण केंद्रात पुरेशा क्लोरीनच्या प्रक्रिया केल्यानंतरच हे पाणी पुरवले जात आहे असे सांगितले. पाण्याचा रंग पिवळसर असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सदर पाणी गाळून व उकळून प्यावे अशी खबरदारी घ्यावी असे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे.


जलपर्णी : जल पत्रात दूषित सांडपाणी व रसायन पाणी मोठ्या प्रणणात साचले असता जलपर्णी तयार होते,

पाणी दूषित असल्यावर जलपर्णी फोफावते. जलपर्णी फोफावलेलं पाणी मेल्यासारखंच दिसू लागतं.. पण या वनस्पतीतले घातक घटक काढून तिचा वापर पाणी शुद्ध ठेवण्यासाठी करणाऱ्या प्रयोगांकडे दुर्लक्षच सुरू आहे.. महाराष्ट्रातील नद्यांना अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. पात्रांमध्ये होणारी अतिक्रमणे, भयंकर प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पात्र व्यापून टाकणारी जलपर्णी!

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून नागरिकांना उल्हास नदीतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या उल्हास नदीत जलपर्णीचा विळखा मोठ्या प्रमाणावर पसरला असून, जलपर्णी काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मशिनरीच्या साहाय्याने काम हाती घेतले आहे. या प्रक्रियेमध्ये जलपर्णी मुळासकट उपटून काढताना जलपर्णीच्या मुळाशी साचलेला गाळ ढवळून निघत असल्याने नदी पात्रातील पाण्याचा रंग गडद पिवळसर झाला आहे. एकीकडे जलपर्णी काढतानाच प्राधिकरणाच्या उकेंद्रातून पाण्याची उचल सुरु आहे. यामुळे जल शुद्धीकरण केंद्रात गढूळ पाणी वाहून नेले जात आहे. त्यामुळे पाणी पिवळसर झाले असून पाण्याला थोडासा वास येतोय.

उल्हास नदीतून जलपर्णी काढण्यास सुरुवात झाल्यानंतर आज शहराच्या अनेक भागात पिवळसर रंगाचा पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सोशल मिडीयावर नागरिकाकडून सुरु झाल्या आहेत. अनेक भागात पिण्याचे पाणी फिल्टर केल्यानंतरही पिवळसर रंगातच राहत असल्याने नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत केडीएमसी प्रशासनाने महापालिकेच्या बाराव्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्यामध्ये क्लोरीनची मात्रा योग्य ठेवून पाणी शुद्ध केलं जात आहे. मात्र पाण्याचा कलर पिवळसर असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सदर पाणी गाळून उकळून वापरण्याची खबरदारी घ्यावी असा आवाहन केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडून प्रसिद्ध पत्र काढण्यात आले आहे तसेच जागोजागी रिक्षामध्ये अनाउन्समेंट करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.