आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउडेशनच्या रस्ता दुरुस्ती लढ्याला यश
कलम भूमि, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण -माळशेज घाट -आळेफाटा -आहिल्यानगर रस्ता डांबरीकरण*
रस्त्याचे काम १५ मे पर्यंत पूर्ण करणार -आमदार किसन कथोरे
कल्याण : आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशन वतीने कल्याण -माळशेज घाट -आळेफाटा रस्ता दूरूस्ती साठी १ मे २०२५ रास्ता रोको करून मोठी आंदोलनाची तयारी करण्यात आली होती, गेल्या ६ महिन्यांपासून यावर तयारी सुरू होती. यामध्ये हजारो प्रवासी,नागरिकांसह , शिवप्रेमी सहभागी होणार होते. हा आवाज महाराष्ट्रात नाही तर दिल्ली पर्यंत पोहचवण्याचा निर्धार होता, तसे निवेदन आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशन वतीने कार्याध्यक्ष बजरंग तांगडकर, आम्ही नगरकर चे विरेंद्र जाधव, जेष्ठ पत्रकार व शिवचरित्र व्याख्याते यांनी मुरबाड प्रांताधिकारी, तहसिलदार, मुरबाड पोलिस स्टेशन, टोकावडे पोलिस स्टेशन, वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरबाड यांना दिले होते. त्याचबरोबर मुरबाड आमदार किसन कथोरे यांना निवेदन देण्यात आले त्याक्षणी आमदार किसन कथोरे यांनी तत्काळ तत्परता दाखवत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधला व आपणास आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, त्वरीत मंगळवार दि. २९ एप्रिल पासून संपूर्ण रस्ता डांबरीकरण काम करण्यास सुरुवात होईल व १५ मे पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली.
हे करत असताना वन विभाग परवानगी मुळे सिमेंट रस्ता काम सुरू होणे अपेक्षित होते परंतु त्याला विलंब झाल्याने आता आंदोलनांची पार्श्वभूमी , प.महाराष्ट्र नागरीकांची गावाला जाताना गैरसौय टाळण्यासाठी संपूर्ण रस्ता डांबरीकरण करण्यात येणार असल्याची व त्यानंतर पुन्हा संपूर्ण रस्ता सिमेंटिकरण करण्यात येईल असे स्पष्ट प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशन शिष्टमंडळाला दिले.
तसेच येणाऱ्या काळात माळशेज घाट पर्यटन दृष्टीने जगातील सर्वात मोठ काचेचा पूल, ६ लेन टनेल काम सुरू होईल ज्यामुळे प्रवास अधिक सुखकारक होईल अशी माहिती शिष्टमंडळाला दिली व आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशन शिष्टमंडळाला आमदार किसन कथोरे यांनी दिलेल्या शब्दाची दखल घेत कार्याध्यक्ष बजरंग तांगडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तसेच आम्ही नगरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश शेळके, कार्याध्यक्ष बजरंग तांगडकर , संचालक मंडळ पदाधिकारी प्रशांत आहेर, तानाजी कर्पे, हिरा आवारी, विरेंद्र जाधव, विक्की फापाळे, नितिन भराट, शशिकांत पात्रे, शिल्पा तांगडकर आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशन पदाधिकारी यांनी आमदार किसन कथोरे यांचे आभार मानले.
