शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण ग्रामीण शहरप्रमुख पदी अमित कोळेकर यांची निवड
कल्याण : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण ग्रामीण शहरप्रमुख पदी अमित कोळेकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार, कक्षप्रमुख उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाने ही निवड करण्यात आली.
त्यांना कार्याध्यक्ष राम राऊत यांनी निवडीचे पत्र सुपूर्द केले. काही दिवसांपूर्वी अमित कोळेकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता, त्यांना पक्षाने मोठी जबाबदारी देऊन प्रामाणिक काम कारणाऱ्या कार्यकर्त्याचा हा गौरव आहे असे जनमाणसात बोलले जात आहे. अमित कोळेकर यांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीला यामुळे ताकद मिळणार आहे.
