आमदार विश्वनाथ भोईर यांचा वाढ दिवस
आनंदांत व उत्सवात साजरा,
कल्याण ,कलम भूमी,प्रतिनिधी,
कल्याण कल्याणचे शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आनंद उत्सव साजरा करण्यात आला, कल्याण मधील माजी आमदार खासदार, व नगरसेवक कार्यकर्ते वं नागरिकांनी मोठ्या उस्तावात तथा आनंदात वाढदिवस साजरा केला, याप्रसंगी
आपल्या लाडक्या आमदाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली,
वाढदिवसा निमित्त दिवस भर विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर भरवीण्यात आले होते,
आरोग्य शिबिर मध्ये डोळे तपासणी व रक्तच्या विविध तपासणी करण्यात आल्या, अंध व अपंगांना अन्नदान करण्यात आले ब्रह्मकुमारी , ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे टेन्शन फ्री जगण्याचे रहस्य सांगण्यात आले, अध्यात्मिक सामाजिक कार्यातून समाजाचे हित वं जगण्याची कला ब्रह्मकुमारी च्या दीदी नी सांगत आमदार विश्वनाथ भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
आमदार विश्वनाथ भोईर,यांच्या मातोश्री बंगला येथे शिंदे गटाचे हजारो शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, बँड बाजा च्या आवाजात तुम जियो हजारो साल च्या धून ने सर्व चाहत्यांचे मन आकर्षित केले, केक कापून फुलांचे बुके व शॉल ने आमदार विश्वनाथ भोईर यांचे अभिनंदन केले, लोकप्रिय आमदार यांनी आलेल्या सर्व नागरिकांचे व चाहत्यांचे आभार मानले,
