Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

उल्हासनदीच्या मोहने जुन्या बांधर्यालगत नवीन बंधारा बांधण्याचा प्रश्न लागणार मार्गी

 

 
.

उल्हासनदीच्या मोहने जुन्या बांधर्यालगत नवीन बंधारा बांधण्याचा प्रश्न लागणार मार्गी

कलम भूमि, कल्याण प्रतिनिघ,

उल्हासनदीवरील मोहने येथील जुना बंधार्यालगत नवीन बंधारा बांधण्याबाबतच्या प्रश्न मार्गी लागला असल्याने मी कल्याणकर सामाजिक संस्थेच्या मागणीला यश आले आहे. उल्हास नदीतील मोहोने बंधारा  येथून उल्हास नदीचे पाणी अडवूनकल्याण डोंबिवली मनपाएमआयडीसीस्टेम् आणि काही औघगिक कंपन्या पाणी उचलतात आणि पाणी पुरवठा करतात.

मोहने बंधारा हा 1950 साली 73 वर्षांपूर्वी एनआरसी कंपनीने बांधला होता.  सद्यस्थितीत त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहेभविष्यात जर हा बंधारा फुटला तर संपूर्ण जिल्ह्यात मोठे पाणीसंकट उभे राहू शकते भविष्यातील संकट लक्षात घेता या बंधाऱ्याच्या काही मिटर अंतरावर एक नवीन बंधारा बांधण्यात यावा ही गेल्या 9 वर्षांपासून मी कल्याणकर सामाजिक संस्थाउल्हासनदी बचाव प्रेमीची मागणी होती.  मंगळवारी कळवा येथील पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता नरेंद्र महाजन यांची मी कल्याणकर सामाजिक संस्था अध्यक्ष माजी नगरसेवक नितिन निकमसहकारी माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी भेट घेतली.


मी कल्याणकर सामाजिक संस्था माध्यमातून 2021 साली 18 दिवसरात्र  नितीन निकम आणि सहकारी यांनी जे उल्हास नदीपात्रात आंदोलन केले होते. मोहने उल्हासनदी जुन्या बंधार्याच्या लगत नवीन बंधारा बांधण्यात यावा या बाबत पाठपुरावा करीत होतो. त्याची प्रशासनाने  दखल घेतली असून लवकरच या बंधाऱ्यासाठी निविदा काढण्यात येणार असून साधारण दोन वर्षात हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून साचलेला  बंधाऱ्या जवळील सर्व मलमूत्र गाळ काढून नदीचे शुद्धीकरण करणार असल्याचे महाजन यांनी सांगत सदर बंधाऱ्यासाठी व गाळ काढण्यासाठी लागणारा सर्व निधी हा पाटबंधारे विभाग उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली. प्रशासनाच्या या दिलेल्या माहितीमुळे उल्हासनदी मोहने बंधार्यालगत नवीन बंधारा बांधण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.o


उल्हास खोरे पाटबंधारे विभाग कळवा यांच्या अधिकारी सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसारमोहने उल्हासनदी नवीन बंधारा बँरेज पध्दतीचा बांधण्यात येणार असून यांची लांबी 170मीटर लांबयामध्ये तीन गेट  व्हर्टिकल आणि बाकीच्या गाळ्यांना देखील गेट असणार असून पावसाळ्यात गेट उघडल्यावर गाळजलपर्णी वैगेरे वाहून जाईल. यामध्ये नवतंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार असून सुमारे 77कोटी रू खर्च अपेक्षित असून आरखाडा तयार आहे.. अंतिम मंजुरी अंती लवकरात लवकर निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे.

Ñ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.