कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
1 जूनपासून राज्याच्या सर्व कार्यालयांमध्ये 'ई-ऑफिस' प्रणाली सुरू करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जाणार आहे. सर्व कार्यालयांत 'ई-ऑफिसेस'चा वापर वाढला की मोबाईलवरही कामकाजाच्या फाईल्स, कागदपत्रे पाहता येणे सोयीचे होणार आहे. संबंधित फाईल्सवर तातडीनं निर्णयही देता येणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडे निर्णयासाठी येणारी फाईल विविध 8 स्तरांमधून येत असल्याची माहिती आहे. या अधिकच्या स्तरांमुळे संबंधित विषयांच्या फाईल्सवर निर्णय होण्यास विलंब लागतो. याचमुळे वेगवान कारभारासाठी आता फाईल्स सादर करण्याचे स्तर कमी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या होत्या. फक्त चार स्तरांवरुनच ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचे निर्देश दिले गेले होते.

