घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध प्रकाराच्या शुल्क वाढी विरोधात रवी पाटील यांचे महा पालिका आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र,
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत नव्याने राबविण्यात येणाऱ्या महा पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापनाच्या धोरणा बाबत शिंदे गटाचे कल्याण जिल्ह्याचे उप जिल्हा प्रमुख रवी पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिका चे आयुक्त अभिनव गोयल याना महा पालिकेच्या घन कचरा वाढीव शुल्का बाबत नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे,दुप्पटीने घन कचरा व्यवस्थापनाच्या शुल्का वाढी विरोधात शिवसेना नागरिकांना नाय मिळून देणार असल्याचे रवी पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रकात सांगितले, तत्कालीन आयुक्त इंदू राणी जाखड यांनी सन 2025 ते 2026 साल करता महा पालिका अर्थ संकल्पात कोणत्याही प्रकारे दर वाढ आकारनी नसताना अचानक घन कचरा व्यवस्थापनाने शुल्कात वाढ केल्याने व्यापारी वर्गात नाराजी पसरली असल्याचे मत रवी पाटील यांनी व्यक्त केली आहे,
सामान्य नागरिकां कडून ९00 रुपये ,दुकाने व दवाखान्या कडून १४४० रुपये,शो रूम, गोदाम यांच्या कडून२८८०रुपये हॉटेल साठी २८८० ते १७२८० रुपये व फेरीवाला २४०० रुपये,हंगामी दुकाने व मेळाव्या साठी१०००० रुपये या प्रमाणे प्रचंड आकारणी करण्यात आली आहे,ही वाढ जनते वर अन्याय कारक असल्याचे मत रवी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केले आहे,

बायो मायनिग, सुका कचरा,ओला कचरा उचलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता ,प्रत्येक इमारतीतून पालिका कर्मचारी कडून कचरा गोळा करणे ,इत्यादी विविध योजना राबविण्यात आल्या होत्या,परंतु या पैकी कोणत्याही योजना पूर्ण पने सफल झाल्या नाहीत,याची जाणीव महा पालिका आयुक्त अभिनव गोयल यांना दिलेल्या पत्रात रवी पाटील यांनी नमूद केले आहे ,शिवसेना नेते रवी पाटील यांनी महा पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची खंत एक उदाहरण दिली आहे ,एखाद्या प्रभागात खत प्रकल्प उभा केल्यास किंमान त्या प्रभागातील कचरा जागेवरच प्रकिया करणे अपेक्षित आहे,जर त्या प्रभागातील कचऱ्यावर पूर्णपणे प्रक्रिया होणार नसेल तर असे प्रकल्प उपयोग शून्य म्हणावे लागेल,
सुका कचरा व ओला कचरा गोळा करण्यासाठी वेग वेगळ्या गाड्या पाठविल्या जातात मात्र या गाड्या एकाच वेळ्यात येत नाहीत,इमारतीत काम करणाऱ्या सफाई कामगारांना जास्त पैसे द्यावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे,अशी माहिती रवी पाटील यांनी पत्रकात दिली आहे, घन कचरा व्यवस्थापनाच्या पूर्ण सक्षमतेने काम करत नसल्याने नागरिक व्यापारी वर्गात असंतोष पसरत असल्याचे मत रवी पाटील यांनी व्यक्त केले,
डंपिंग ग्राउंड परिसरातील दुर्गांधी कमी करण्या साठी महापालिकेने केलेल्या प्रयत्नांना कुठेही यश आलेले दिसत नाही, त्या मुळे परिसरात कायम दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे,वाढत्या लोकसंख्या साठी नवीन डंपिंग ग्राउंड उभारण्यास स्थानिकांन कडून तीव्र विरोध होत असल्याचे मत रवी पाटील यांनी व्यक्त केले आहे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबविण्यात महा पालिकेला अजून यश आले नाही, घन कचरा व्यवस्थापनातील त्रुटी चां आलेख फार वाढला असून अशा परिस्थितीत त्यावर प्रचंड शुल्क वाढ करणे अन्यायकारक आहे,तरी या प्रकरणात पूर्ण विचार करून अशी शुल्क वाढ करण्या बाबत सकारात्मक विचार करन्याची गरज असल्याचे विनंती पत्र रवी पाटील यांनी महा पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांना दिलेची माहिती रवी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे,

